×

उच्चतम सेवा पीडित साहाय्य    S.E.V.A. (Service Excellence & Victim Assistance) यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुळ उद्दीष्ट हे पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अभ्यागतांची / तक्रारदारांचे तक्रारींची निर्गतीचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पूर्ण होवुन, त्यातुन त्यांचे समाधान होणे अपेक्षीत असुन, त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचविण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणा राबविताना, पोलीस स्टेशन मध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची, सर्व माहिती या यंत्रणेव्दारे संगणकामध्ये संकलीत होणार आहे.